राम कदम यांच्या विरोधात एफआयआर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 October 2014

राम कदम यांच्या विरोधात एफआयआर

ram kadam
मुंबई – ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षबदल करणारे घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राम कदम यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाला आहे. निवडणूक आयोगाच्या विजलेंस पथकाने कदम यांच्यावर फसवणूकीचा आरोप करत त्यांच्या विरोधात घाटकोपर पोलिस स्थानकात एफआयआर दाखल केला. घाटकोपर पश्चिमेला असल्फा विलेजमध्ये गणपती मंदिराजवळच्या मोकळया जागेत राम कदम यांनी निवडणूक प्रचारासाठी कार्यालय थाटले होते. 

या कार्यालयात त्यांनी लाऊडस्पीकर लावून निवडणूक प्रचार केला. काही जणांनी याची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. निवडणूक आयोगाच्या तपासामध्ये या आरोपात तथ्य आढळून आल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशावरुन घाटकोपर पोलिसांनी कदम यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. २००९ मध्ये राम कदम मनसेच्या तिकीटावर घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. यावेळी पक्षाकडून तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Post Bottom Ad