मध्य रेल्वे स्थानकांवर अँडव्हान्स रिझर्व्हेशन काऊंटर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 October 2014

मध्य रेल्वे स्थानकांवर अँडव्हान्स रिझर्व्हेशन काऊंटर

मुंबई : उपनगरीय रेल्वेवर दिवसेंदिवस वाढणारी गर्दी आणि तिकीट काढण्यासाठी लागणार्‍या रांगा यामधून प्रवाशांची सुटका करण्यासाठी मध्य रेल्वेने आपल्या २0 रेल्वे स्थानकांवर विशेष काऊंटर सुरू केले आहे. या काऊंटरवर प्रवाशांना आता स्वत:चे तिकीट स्वत:च काढता येणार आहे. सेल्फ अँडव्हान्स रिझर्व्हेशन काऊंटर या योजनेच्या नावाखाली मध्य रेल्वेने आपल्या २0 रेल्वे स्थानकांवर ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मध्य रेल्वेच्या २0 रेल्वे स्थानकांवर ही योजना राबवण्यात येणार आहे. २0 स्थानकांवर ४५ काऊंटरद्वारे ही योजना राबवण्यात येणार आहे. अंबरनाथ (२), बेलापूर (१), भिवंडी रोड (१), भांडुप (१), भायखळा (२), चेंबूर (१), सीएसटी (१0), डोंबिवली (२), दादर (१), घाटकोपर (२), कल्याण (५), लोणावळा (१), एलटीटी (३), मुंब्रा (१), मुलुंड(२), पनवेल(१), ठाणे (५), उल्हासनगर (१), वर्तकनगर (१) आणि वाशी (२) या स्थानकांवर ही योजना राबवण्यात येणार आहे. १३ फे ब्रुवारी ते १0 एप्रिलपर्यंतच ही योजना राबवण्यात येणार आहे. प्रवासी स्वत:चे आणि आपल्या कुटुंबाचे तिकीट या स्पेशल काऊंटरवर काढू शकतो. सकाळी ८ ते ९.४५ वाजेपर्यंतच ही योजना सुरू असणार आहे. तसेच तत्काळ तिकीट सकाळी ९.४५ ते १0.३0 या वेळेतच काढण्याची सोय देण्यात आली आहे. 

या स्पेशल काऊंटरचा उपयोग करण्यासाठी प्रवाशांना स्वत:चे आयडी प्रुफ रिझर्व्हेशन स्लीपसोबत जोडायचे आहे. तसेच आयडी प्रुफ व्हेरीफिकेशनसाठीसुद्धा दाखवावे लागणार आहे. या योजनेअंतर्गत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही खास काऊंटर देण्यात आली आहेत. महिलांसाठी चर्चगेट, मुंबई सेंट्रल, अंधेरी, बोरिवली आणि सुरत येथे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी चर्चगेट, दादर, अंधेरी, गोरेगाव, मालाड आणि बोरिवली या स्थानकांवर स्पेशल काऊंटर देण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक स्थानकात ५ काऊंटर देण्यात आली आहेत. त्यामुळे रेल्वे आरक्षण खिडक्यांवर गर्दी होणार नाही.

Post Bottom Ad