पिडीतांकडून एन विभागावर धडकणार
मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेने अनधिकृत, बेकायदेशीर बांधकामे तसेच जुनी बांधकामे तोडण्यासाठी काही नियम व कायदे बनवले आहेत. असे कायदे व नियम विकासक आणि बिल्डर यांना खुश करण्यासाठी घाटकोपरच्या एन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून धाब्यावर बसवले जात असल्याने पालिकेचे हे अधिकारी पालीकेच्साठी काम करतात कि विकासकांसाठी काम करतात असे प्रश्न घाटकोपरवासियांकडून विचारले जात आहेत.
घाटकोपर पश्चिम येथील सर्वोदय रुग्णालयाजवळ एसटी थांब्याजवळ भीमाशंकर परिसर विकास प्रतिष्ठान कडून विधवा महिलांसाठी चालवल्या जाणाऱ्या पोळी भाजी केंद्राला अशीच ३१४ कलमान्वये शुक्रवारी १७ तारखेला नोटीस बजावण्यात आली आहे. जेणे करून नोटीस बजावल्या नंतर शनिवार आणि रविवार व दिवाळीची कोर्टाला असलेली सुट्टी यामुळे संबंधिताना दाद मागता येणार नाही याचा बंदोबस्त करण्यात आला आहे. पालिकेने या संस्थेची नोटीस पोळी भाजी केंद्राच्या बाहेर चिकटवून त्यावर एक लाकडाची फळी ठेवून हि नोटीस कोणाला लावली आहे याची माहिती पडणार नाही याची दखल घेतली आहे. यामुळे एन विभागातील अधिकारी विकासक बिल्डर आणि राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर गरिबांना त्रास देत असल्याने संस्थेचे अध्यक्ष गोपाळे यांनी घाटकोपर पोलिस ठाण्यात एकमे बिल्डर विरोधात तक्रार दाखल केली असता विकासका विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घाटकोपर पश्चिम येथेही काजूपाडा, भटवाडी येथील मंगलकृपा चाळीतील ३३ ते ३४ रहिवाश्यांची घरे विकासक आणि स्थानिक राजकीय नेत्यांना खुश करण्यासाठी पालिकेच्या एन विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून १० सप्टेंबरला गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी तोडली आहेत. याबाबत येथील रहिवाश्यांनी उच्च न्यालयात दाद मागितली असता पालिका अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढत जुनी बांधकामे तोडायला अधिकारयांना इतकी घाई का झाली, सुट्टीचे दिवस धरून नोटीसा दिल्या जातात यामुळे सबंधीताना न्यायालयात दाद मागता येणार नाही याची पुरेपूर काळजी अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे. संबंधितानी न्यायालयात दाद मागितली असतात न्यायालय काय निकाल देते याची वाट न बघता तोडक कारवाही केली जाते, यामुळे अश्या अधिकाऱ्यांवर सिटी सिव्हिल कोर्टात केस चालावण्याचे आदेश दिले आहेत.
एन विभागातील अधिकाऱ्यांकडून असे प्रकार मोठ्या प्रमाणत होत असल्याने एन विभागातील अधिकारी विकासकांच्या हातातील बाहुले बनून काम करत आहेत. अश्या अधिकाऱ्यांकडून फक्त गरिबांना त्रास दिला जात असल्याने याबाबत पालिका आयुक्त तसेच मुंबईच्या महापौरांनी दखल घेवून गरिबांना न्याय द्यावा तसेच बिल्डर विकासक यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाही करावी अशी मागणी केली जात आहे. विकासकांच्या हातातील बाहुले बनून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाही करावी या मागणीसाठी पिडीतांकडून लवकरच एक मोर्चा काढला जाणार आहे.