विद्यार्थ्यांना चिकी देण्याचा प्रस्ताव कागदावरच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 October 2014

विद्यार्थ्यांना चिकी देण्याचा प्रस्ताव कागदावरच

मुंबई - महापालिकेतील विद्यार्थ्यांना चिकी देण्याचा महापालिकेचा प्रस्ताव अद्याप कागदावरच आहे. सुरुवातीला दिवसाला 15 टन चिकी देण्यासाठी कंत्राटदार मिळत नसल्याने चिकीचा प्रस्ताव रखडला होता; तर आता चिकीत भेसळ होऊ नये यासाठी त्यावर पालिकेची मोहोर उमटवण्याची अट आहे; मात्र चिकीवर महापालिकेची मोहर उमटण्यात अडचणी असल्यामुळे कंत्राटदारांनी ही अट रद्द करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. 

विद्यार्थ्यांना सुगंधी दूध बाधत असल्याने चिकी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यासाठी दिवसाला 15 टन चिकी लागणार होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवठादार नसल्याने पालिकेने तीन विभागात विभागणी करून निविदा काढल्या. त्याला कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला; मात्र चिकीत भेसळ होऊ नये; तसेच ती चांगल्या पद्धतीने बनवलेली असावी, याची खात्री मिळण्यासाठी चिकीवर पालिकेची मोहर उमटवणे बंधनकारक करण्यात आले. आता ही मोहरच मोठा अडथळा ठरत आहे. चिकीवर मोहर उमटत नसल्याने ही अट शिथिल करण्याची मागणी कंत्राटदारांनी केली आहे. चिकीची फाईल अतिरिक्त आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवली असल्याचे मंगळवारी प्रशासनाने शिक्षण समितीच्या बैठकीत सांगितले.

Post Bottom Ad