जलदेयक थकबाकीपोटी १६ महिन्यांत ११९ कोटींची वसुली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 October 2014

जलदेयक थकबाकीपोटी १६ महिन्यांत ११९ कोटींची वसुली

अभय योजनेतंर्गत मुंबई महापालिकेने गेल्या १६ महिन्यांत जलदेयक थकबाकीपोटी ११९ कोटी ४४ लाख रुपयांची वसुली केली आहे. जलदेयकाची थकबाकी अधिकाधिक करण्यासाठी स्थायी समितीने गुरुवारी अभय योजनेला एक महिन्याची मुदतवाढ दिली. 

पाणीदेयकांची वसुली होण्यासाठी महापालिकेने अभय योजना सुरू केली. या योजनेतंर्गत महापालिकेने पाणीदेयकाचे एकरकमी अधिदान देणार्‍याला २ टक्के असलेला अतिरिक्त आकार (दंड) माफ केल्यामुळे या योजनेला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यामुळे पालिकेने १६ जून २0१३ ते १५ ऑक्टोबर २0१४ या कालावधीत ११९ कोटी ४४ लाख रुपयांची वसुली केली. विधानसभा निवडणुकीमुळे वसुलीची प्रक्रिया मंदावली होती. यामुळे ही योजना आणखी पुढे सुरू ठेवण्यासाठी त्याला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने समितीसमोर मांडला. त्यावर बराच उहापोह होऊन समितीने त्याला संमती दिली. भाजपाने प्रस्तावाला विरोध केला, मात्र यावरून शिवसेना आणि मनसेचे सदस्य एकत्र आले आणि त्यांनी हा प्रस्ताव संमत केला.

Post Bottom Ad