राईट टू पी, हागणदारीमुक्ततेसाठी योजना व आराखडा - कुंटे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 October 2014

राईट टू पी, हागणदारीमुक्ततेसाठी योजना व आराखडा - कुंटे

मुंबईत महिलांच्या प्रसाधनगृहासाठी 'राईट टू पी' या संस्थेसोबत बैठका घेऊन एक आराखडा तयार करण्यात येईल व त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी पत्रकारांना सांगितले. पालिका मुख्यालयात दिवाळीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या समारंभात ते पत्रकारांशी बोलत होते. 
'राईट टू पी' संदर्भात काही अडचणी आहेत. 'राईट टू पी' संस्थेच्या सुप्रिया सोनार व या संस्थेच्या अन्य महिला पदाधिकार्‍यांनी महिला प्रसाधनगृहांबद्दल चांगला अभ्यास केला आहे. त्यांना सोबत घेऊन आम्ही सात बैठका घेतल्या असून त्यांना जेथे आवश्यक वाटते तेथे पाहणी करून प्रसाधनगृह उपलब्ध करून देऊ. त्यासाठी आराखडाही तयार केला आहे, असे आयुक्त म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानमुळे लोकांना कचरा नेमका कुठे टाकायचा याबाबत व स्वच्छता राखण्याबद्दल सवय लागणार आहे, असेही कुंटे म्हणाले. या अभियानाला केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावर आणि रेल्वेकडून चांगले सहकार्य मिळत आहे, असा दावा त्यांनी केला. 

हागणदारी मुक्ततेसाठी योजना मुंबई हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांना शौचालय उपलब्ध व्हावे, त्याचे व्यवस्थापन चांगले राहावे यासंबंधी नियोजन केले आहे. झोपडपट्टी विभागात शौचालयांची कमतरता आहे. त्यासाठी एक योजना तयार केली आहे. पालिकेने हागणदारीमुक्ततेच्या दिशेने पाऊल टाकले आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

Post Bottom Ad