मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीमध्ये पाण्याच्या थकित बिला संदर्भात लागू केलेल्या अभय योजनेचा कालावधी वाढवून मिळावा याबाबात केलेल्या निवेदनावर भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी या योजनेचे लाभार्थी कोण आहेत , ही योजना कोणासाठी, याचा फायदा कोणाला असे प्रश्न उपस्थित केल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी हे प्रश्न स्वतावर घेतल्याने भाजप व शिवसेनेत जोरदार खडाजंगी झाली.
पालिकेकडून पाण्याच्या बिलाचे एकरकमी अधिदान केल्यास २ टक्के अतिरिक्त आकार माफ करण्याकरिता अभय योजना सुरु केली पालिकेची ११२८ कोटी रुपयांची थकबाकी असून ४४३ कोटी रुपयांचा अतिरिक्त आकार आहे या मध्ये शासकीय कार्यालयांची ७५ कोटी रुपयांची थकबाकी आहे त्यापैकी ४७ कोटी रुपयांची वसुली करून २७ कोटी रुपयांची सुत दिली आहे. ९२ कोटी रुपयांची थकबाकी आहे त्यापैकी ७१ कोटी रुपयांची वसुली करून २१ कोटी रुपयांची सुत दिली आहे. त्यामुळे पालिकेला ४८ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.
पालिकेची पाण्याची बिले. सामान्य लोक वेळेवर भारतात.परंतु विकासक व धनदाडग्यांकडून अशी बिले वेळेवर भरली जात नाहीत. यामुळे पालिकेची ही अभय योजना धनदाडग्यांच्या सोयीसाठी असल्याने या लाभार्थ्यांची यादी व ज्यांची बिले अजून वसूल करण्याचे बाकी आहे , अश्या लोकांची यादी जाहीर करावी अशी मागणी कोटक यांनी केली. अश्या प्रश्नावरून प्रशासनाला धारेवर धरण्याचे सोडून स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी याला विरोध केला . सेनेच्या मदतीला मनसेचे हे धावून गेले त्यामुळे भाजप विरोधात मनसे व सेना असा सामना स्थायी समितीत . या खडाजंगी मध्येच या योजनेला २१ नोव्हेंबर पर्यंत वाढवायला मंजुरी देण्यात आली.