उथळ शिवसेनेबरोबर युती नकोच - स्वराज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 October 2014

उथळ शिवसेनेबरोबर युती नकोच - स्वराज

मिरज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलणार नाही, असे निःसंदिग्धपणे सांगून आपली मर्यादा पाळली; पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपच्या नेत्यांना "अफझलखाना‘च्या फौजेची उपमा देऊन मोकळे झाले. ही अत्यंत क्‍लेषदायक बाब आहे. अशा उथळ शिवसेनेवर युती नकोच, त्यांना जनताच आता धडा शिकवेल, असा टोला परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांनी आज येथे लगावला. आमदार सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ किसान चौकातील जाहीर सभेत त्या बोलत होत्या. 

त्या म्हणाल्या, की शिवसेना आणि भाजपची युती का तुटली, याबद्दल आम्ही कधी बोललो नाही, बोलणारही नाही. याची खरी कारणे सर्वांनाच ठाऊक आहेत. यासाठी नरेंद्र मोदींसारख्या पंतप्रधानपदावरील व्यक्तीनेही संयम पाळला. शिवसेनाही हा संयम पाळेल, अशी आमची भाबडी अपेक्षा होती; पण मोदी यांच्या संयमाचा नेमका उलटा अर्थ लावून उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना "अफझलखानाची फौज‘ म्हणून संबोधणे हा आमच्यासाठी मोठा विश्‍वासघात आहे. त्यामुळे भविष्यात उरलीसुरली युतीचीही शक्‍यता आता पूर्ण मावळली आहे. अशी युती करण्याची वेळच येणार नाही, या एकमेव उद्देशाने भाजपने पूर्ण बहुमताची तयारी सुरू केली आहे. जनता निश्‍चित त्याला साथ देईल.

Post Bottom Ad