ठाणे : स्मशानभूमीची जमीन हडपून त्या ठिकाणी गोदाम बांधणाऱ्या आरोपींविरोधात वर्षभरापूर्वी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे; मात्र त्यांना अजूनपर्यंत अटक करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ कल्याण तालुक्यातील वाघेरापाडा येथील आदिवासींनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
कांबा येथील आदिवासींची शेती एका कुटंबाने बनावट कागदपत्रांद्वारे हडपून तेथे बेकायदा गोदाम बांधले. त्यानंतर शेजारच्या मोकळ्या जमिनीवर बुलडोझर फिरवून जमिनीचे सपाटीकरण केले. या जमिनीवर अनेक वर्षांपासून स्मशान होते, असे आदिवासींनी सांगितले. याप्रकरणी ऍट्रॉसिटी कायद्यान्वये वर्षभरापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला; मात्र पोलिसांकडून अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही, त्यामुळे आदिवासींनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.