बलात्कारांचे वाढते प्रकार रोखण्यासाठी वेश्या व्यावसायाला अधिकृत मान्यता देण्यात यावी, अशी खळबळजनक मागणी कर्नाटक लिंगायत समजाच्या धर्मगुरू माते महादेवी यांनी केली आहे. उत्तेजक कपडे परिधान केल्यामुळेच महिलांवर अत्याचार होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून, विविध संघटनांकडून त्यांचा निषेध करण्यात येत आहे.
कर्नाटकातील धारवाड येथे महादेवी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. समाजातील अनेक व्यक्तींनी यापूर्वी अशा प्रकारची मागणी केली होती. त्यामुळे अशी मागणी करणारी आपण पहिली व्यक्ती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात वेश्या व्यावसायाला अधिकृत मान्यता दिली नाही, तर महिलांवरील बलात्कार, छेडछाड, लैगिंक शोषणाचे प्रकार वाढतच राहतील, अशी भीतीही महादेवी यांनी व्यक्त केली आहे. सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांचा महिलांकडून गैरवापर होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.