'तत्काळ'ची निम्मी तिकिटे 'डायनॅमिक' दराने मिळणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 October 2014

'तत्काळ'ची निम्मी तिकिटे 'डायनॅमिक' दराने मिळणार

मुंबई : तत्काळ कोट्यातील 50 टक्के तिकिटे यापुढे "डायनॅमिक‘ दराने (म्हणजे मागणीनुसार वाढणाऱ्या दराने) प्रवाशांना देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.तत्काळ कोट्यातील 50 टक्के तिकिटे तत्काळ आणि उरलेली डायनॅमिक दराने देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून (ता. 3) पश्‍चिम रेल्वे करणार आहे. मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्‍स्प्रेस, मुंबई-हजरत निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती राजधानी एक्‍स्प्रेस, अहमदाबाद-नवी दिल्ली सुवर्ण जयंती राजधानी एक्‍स्प्रेस, वांद्रे टर्मिनस-अमृतसर पश्‍चिम एक्‍स्प्रेस, वांद्रे टर्मिनस-जोधपूर गोल्डन टेम्पल मेल, दादर-बिकानेर एक्‍स्प्रेस, इंदूर-ग्वाल्हेर एक्‍स्प्रेस व इंदूर-भिंड एक्‍स्प्रेस या गाड्यांची तत्काळ आरक्षणातील 50 टक्के तिकिटे डायनॅमिक दराने प्रवाशांना देण्यात येणार आहेत. 


रेल्वेच्या 80 गाड्यांना सध्या तत्काळची सुविधा उपलब्ध आहे. निधीची चणचण भासत असलेल्या रेल्वेने महसूलवाढीसाठी ही योजना आखल्याचे स्पष्ट आहे. या योजनेनुसार तत्काळ कोट्यातील निम्मी तिकिटे नेहमीच्या दराने तर पन्नास टक्के तिकिटे "प्रीमियम तत्काळ‘नुसार दिली जातील, असे रेल्वे मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. याचा अर्थ, एखाद्या गाडीच्या तिकिटांना जास्त मागणी असेल, तर प्रवाशांना त्यासाठी जास्त रक्कम मोजावी लागेल. येत्या एक ऑक्‍टोबरपासून ही योजना सुरू होत असून, प्रीमियम गाड्यांप्रमाणे ही सुविधा फक्त ऑनलाइन उपलब्ध असेल. रेल्वेच्या 80 गाड्यांसाठी ही योजना असून, आपापल्या विभागातील पाच लोकप्रिय गाड्यांची माहिती कळविण्यास रेल्वेच्या सर्व विभागांना सांगण्यात आल्याचे रेल्वे मंडळाच्या (वाहतूक) सदस्य डी. पी. पांडे यांनी सांगितले. 

Post Bottom Ad