वाडा : पालघर जिल्ह्यात आदिवासींना दिलेल्या आरक्षणाच्या निषेधार्थ वाडा तालुक्यातील बऱ्याचशा गावांमध्ये बिगरआदिवासी मतदारांनी विधानसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा घेतलेला निर्णय अजूनही कायम ठेवला आहे. तशा प्रकारचे फलक गावोगावी लागले आहेत.
आरक्षण आणि पेसा कायद्यामुळे आमच्या हक्कावरच गदा आल्याने आम्ही मतदान न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे निचोळे येथील कोंडू पष्टे यांनी सांगितले. ज्यांना मतदान करायचे नाही त्यांनी मतदान करू नका; मात्र मतदान करण्यास जाणाऱ्यांना अडथळा आणू नका, आपापल्या गावात शांतता राखून कायदा आणि सुव्यस्थेचे पालन करा, असे आवाहन बिगरआदिवासी आरक्षण हक्क बचाव समितीचे वाडा तालुकाध्यक्ष विलास आकरे आणि सचिव चंद्रकांत पष्टे यांनी केले आहे.
बहिष्कारामुळे विद्यमान निवडून येण्याची भीती
विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील पालसई गटातील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. मात्र हा बहिष्कार विष्णू सवरा यांच्या पथ्यावर पडला असून बहिष्कारामुळे सवरांच्या विजयाची आशा बळावेल, अशी चर्चा आहे. आदिवासींना आरक्षण देण्यात सवरा यांचा मोठा वाटा असल्याने पालसई गटात बहिष्कार न टाकता सवरा यांच्याविरोधात मतदान करून त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन समितीच्या अन्य सदस्यांनी केले आहे.