मुंबई : पालिका आरोग्य विभागाच्या अधिकार्यांना विधानसभा निवडणुकीच्या कामात जुंपल्याने मुंबईत मलेरियाचे व डेंग्यूचे प्रमाण वाढले आहेत, असा गंभीर आरोप सर्व पक्षीय नगर सेवकांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत केला
तसेच पालिका प्रशासनाने यावर योग्यती उपाययोजना करावी व रुग्णांना योग्य उपचार द्यावेत अशी मागणीही यावेळी नगरसेवकांनी केली. शिवसेनेचे नगरसेवक रमाकांत राहटे यांनी हरकतीच्या मुद्द्यद्वारे डेंग्यू व मलेरियाच्या साथीबाबत चर्चा उपस्थित केली. निवडणूक कामासाठी आरोग्यविभागाच्या अधिकार्यांना जुंपल्याने आता पुऱ्वी सारखी धूरफवारणी केली जात नाही. पावसाळ्यात डेंग्यू मलेरिया चे प्रमाण कमी होते. मात्र आता के / पश्चिम , एच/ पश्चिम, पी/ उत्तर, ई, एफ /दक्षिण एल व एस या वार्डा मध्ये मलेरियाचे,डेंग्यूचे प्रमाण वाढले आहे . तसेच रुग्णालयात मलेरिया डेंग्यूच्या रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही. पालिकेने रुग्णांच्या जीवाशी होणारा खेळ त्वरित थांबवावा व योग्य उपाय योजना करावी , अशी मागणी रमाकांत रहाटे यांनी केली.