फोटो - शपथविधी सोहळा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 October 2014

फोटो - शपथविधी सोहळा


dev

वानखेडे स्टेडियमवर ऐतिहासिक अशा सोहळ्यात, खच्चून भरलेल्या गर्दीच्या साक्षीने विदर्भाचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या निमित्ताने भाजपचा पहिला मुख्यमंत्री महाराष्ट्रात विराजमान झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत फडणवीस यांचा शपथविधी झाला. या सोहळ्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती खास अशी ठरली. शिवसेनेने या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. मात्र, आज दुपारी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी फोन केल्यानंतर उद्धव यांनी बहिष्काराची तलवार म्यान केली. गर्दीमुळे उद्धव यांना काहीसा उशीर झाला. देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर उद्धव तेथे पोहोचले.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह अनेक धार्मिक गुरू, उद्योजक, चित्रपट सृष्टीतील मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली.

यांनी घेतली शपथ

कॅबिनेट मंत्री

एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विष्णु सावरा

राज्यमंत्री

दिलीप कांबळे, विद्या ठाकूर
फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये उपस्थित असलेल्या उद्धव ठाकरे  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी त्यांची पत्नी आणि आई आवर्जून उपस्थित होत्या.
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
भाजप मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांचे उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Post Bottom Ad