बेस्टची वीज चोरणार्‍या १९ जणांवर गुन्हे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 October 2014

बेस्टची वीज चोरणार्‍या १९ जणांवर गुन्हे

मुंबईमध्ये शहर विभागात बेस्ट उपक्रमातर्फे वीज पुरविण्यात येते. धारावी, माहीम यासारख्या झोपडपट्टी भागात बेस्टची वीज चोरून वापरण्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. त्याविरुद्ध बेस्ट प्रशासनाने या भागात टाकलेल्या धाडीमध्ये १९ वीज चोरांवर शाहुनगर, धारावी आणि माहीम पोलीस ठाण्यात वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

धारावी, माहीम यासारख्या झोपडपट्टी भागात मोठय़ा प्रमाणात गारमेंट, प्लास्टिक, मोल्डिंग, इलेक्ट्रोप्लेटिंगसारखे छोटे उद्योग बेस्ट उपक्रमाची वीज सेवा वापरतात. या विभागात काही समाजकंटक स्वत:च्या फायद्यासाठी विजेच्या थेट जोडणीद्वारे मीटर बायपास करून चोरून वीज वापरतात, असे उपक्रमाच्या निदर्शनास आले. बेस्टच्या दक्षता विभागाने या विभागात वारंवार धाडी घालून वीज चोरांवर विद्युत कायदा अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल केले जातात. काही दिवसांपूर्वी दक्षता विभागाने धारावी आणि माहीम झोपडपट्टी भागात मोठय़ा धाडी टाकून बेकरी, गारमेंट व इलेक्ट्रोप्लेटिंग व्यवसाय थेट वीज जोडणीद्वारे चालत असल्याचे उघडकीस आणले. या धाडीमध्ये १९ वीज चोरांवर शाहुनगर. धारावी व माहीम पोलीस ठाण्यात वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून कायद्यान्वये वीजचोरीची रक्कम व दंड लावण्यात आला आहे. 

Post Bottom Ad