चेंबूर विधानसभा मतदारसंघातील मतदार केंद्रात बदल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 October 2014

चेंबूर विधानसभा मतदारसंघातील मतदार केंद्रात बदल

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २0१४ अंतर्गत १७३ चेंबूर विधानसभा मतदारसंघाच्या मतदान केंद्रांच्या ठिकाणामध्ये निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार बदल करण्यात आला आहे. या मतदान केंद्राच्या क्षेत्रात समाविष्ट असलेल्या मतदारांनी बदललेल्या मतदान केंद्रात मतदान करावे, असे आवाहन १७३ चेंबूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा, पत्राशेड खोली नं. १, पी. एल. लोखंडे मार्ग, चेंबूर येथील मतदान केंद्र क्रमांक २७ ते ३८ हे या शाळेच्या बाजूला असलेल्या मनपा अधिकार्‍यांच्या जुने वसाहतीच्या पटांगणात उभारण्यात आलेल्या मंडप क्रमांक १ ते ३८ मध्ये स्थलांतरित करण्यात आले आहेतसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल आणि कॉलेज, नवी इमारत हॉल ब, तळमजला, पी. एल. लोखंडे मार्ग, चेंबूर येथील मतदान केंद्र ३९ हे चेंबूर स्थानक, म्युनिसिपल शाळा, प्राथमिक संकुल, पहिला मजला, खोली क्रमांक १११ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल आणि कॉलेज, नवी इमारत, मंडप, पी. एल. लोखंडे मार्ग, चेंबूर येथील मतदान केंद्र ४0 हे चेंबूर स्थानक, म्युनिसिपल शाळा, प्राथमिक संकुल, तळमजला हॉल पार्टीशन ड व मतदान केंद्र ४१ हे चेंबूर स्थानक, म्युनिसिपल शाळा, प्राथमिक संकुल, तळमजला, पार्टीशन ई येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल आणि कॉलेज, नवी इमारत, मंडप, पी. एल. लोखंडे मार्ग, चेंबूर येथील मतदान केंद्र ४२ हे चेंबूर स्थानक, म्युनिसिपल प्राथमिक शाळा, पत्राशेड रूम क्रमांक ४ व मतदान केंद्र ४३हे चेंबूर स्थानक, म्युनिसिपल प्राथमिक शाळा, पत्राशेड रूम क्रमांक २ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल आणि कॉलेज, नवी इमारत, मंडप, पी. एल. लोखंडे मार्ग, चेंबूर येथील मतदान केंद्र ४४ हे चेंबूर स्थानक, म्युनिसिपल प्राथमिक शाळा, पत्राशेड मंडप १ व मतदान केंद्र ४५हे चेंबूर स्थानक, म्युनिसिपल प्राथमिक शाळा, पत्राशेड मंडप २, मतदान केंद्र ४६ हे पत्राशेड मंडप क्रमांक ३, मतदान केंद्र ४७ हे मंडप क्रमांक ४ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. तर तेथील मतदान केंद्र क्रमांक ४८, ४९, ५0, ५१ हे म्युनिसिपल शाळेच्या पत्राशेड येथे अनुक्रमे मंडप क्रमांक ५, ६, ७, ८ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

Post Bottom Ad