मुंबई - महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.या निवडणुकीत ९४ महिला निवडणुकीच्या रिंगणात आहेत.या महिला उमेदवाराना राज्य महिला लोक आयोगाने पाठींबा जाहीर आहे.परंतु ज्या मतदार संघात एकही महिला उमेदवार नसेलत्या ठिकाणी`नोटाचा वापर करणार असल्याचे राज्य महिला लोक आयोगाच्या कार्याध्यक्षा अॅड. वर्षा देशपांडे यांनी जाहीर केले आहे.
महाराष्ट्र सरकारने महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्याने ज्या विभागात एकही महिला उमेदवार नसून फ़क़्त पुरुष उमेदवार असतील त्या ठिकाणी नोटाचा वापर करण्यात येणार आहे. अशी भूमिका घेण्यात आल्याचे देशपांडे यावेळी म्हणाल्या. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थे मध्ये महिलांना आरक्षणामुळे प्रतिनिधित्व करण्याचा मिळाला. मात्र लोकसभेच्या व विधान सभेच्या निवडणुकीत ताठ मानेने महिलांना निवडणुकीला सामोरे जाता यावे यासाठी महिला विधेयक संमत करावे म्हणून सातत्याने आम्ही यापूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उप मुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,देवेंद्र फडणविस, पंकजा मुंडे, खासदार वंदना चव्हाण,सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली होती.
महिलांना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी आम्ही सातत्याने महिला लोक आयोगाच्या माध्यमातून कार्यशाळा घेऊन पटवून दिले. १७ वर्षांपासून महिला विधेयक मंजूर करण्यासाठी आम्ही सातत्याने झगडूनही न्याय मिळालेला नाही.'असे देशपांडे यावेळी म्हणाल्या. तसेच विधान सभेच्या निवडणुकीत विविध पक्षांनी महिलांनी उमेदवारी दिली आहे यावर त्यांनी समाधान व्यक्त केले. तरीही पुरुषांच्या तुलनेत महिलांना उमेदवारी देण्यात विसंगती आहे, असे म्हणाल्या.कोकण विभागात एकाही पक्षाने महिलांना उमेदवारी दिलेली नाही. तर मुंबई- ठाणे विभागांत सर्वात जास्त महिलांना उमेदवारी दिली असल्याचे देशपांडे यावेळी म्हणाल्या.