ठाणे - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या वर्षी आतापर्यंत रचलेल्या ११७ सापळ्यांमध्ये १७३ लाचखोर सापडले असून त्यामध्ये तृतीय श्रेणीतील कर्मचारी सर्वाधिक ८४ म्हणजेच (४८ टक्के) इतके आहेत. साधारणपणे या वर्गातील कर्मचारी हे वरिष्ठ अधिकाऱ्यांची वसुली करतात, असे अनेकदा लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये दिसून आले आहे. त्याखालोखाल पकडले गेलेले २९ अधिकारी द्वितीय श्रेणीतील आहेत.
लाचखोरांविरोधात पोलिसांकडून नेहमीच कारवार्ई केली जात असली, तरी गेल्या काही महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही मोहीम आणखी तीव्र केली आहे. लाचखोरीविरोधात व्यापक जनजागृती करुन अधिकाधिक तक्रारदारांना प्रोत्साहन देण्याचे काम या विभागाकडून सातत्याने केले जात आहे.
त्याचा अपेक्षित परीणाम दिसून आला असून ११७ सापळ्यांमध्ये १७३ लाचखोर पकडले गेले आहेत. यामध्ये १८ महिलांचा समावेश आहे. पकडले गेलेल्या आरोपींमध्ये सर्वात जास्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलिसच आहेत. ऑक्टोबरअखेरपर्यंत ४७ पोलिसांना लाच घेतांना अटक झाली आहे. त्याखालोखाल २७ महापालिका अधिकारी व कर्मचारी आणि तिसऱ्या क्रमांकावर महसूल विभागाचे २२ कर्मचारी असल्याची माहिती या विभागाचे अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.