घाटकोपर पूर्वमध्ये मतदार याद्यांतून अख्खी इमारत गायब - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 October 2014

घाटकोपर पूर्वमध्ये मतदार याद्यांतून अख्खी इमारत गायब

मुंबई - घाटकोपर पूर्व या विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांतून 13 मजली इमारतच गायब झाल्याचे आढळून आले आहे. त्याबाबत कॉंग्रेसचे उमेदवार प्रवीण छेडा यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे; मात्र त्यावर अद्याप कार्यवाही झाली नसल्याचे समजते. 

घाटकोपरमधील महात्मा गांधी रोडवर असलेल्या क्‍लोवर इमारतीत 300 मतदार आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी मतदान केले होते; मात्र या निवडणुकीसाठी तयार केलेल्या मतदार याद्यांमध्ये या इमारतीतील मतदारांची नावेच गायब आहेत. मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी नव्याने अर्ज भरून दिले आहेत. त्यांची नावे समाविष्ट करण्याची मागणी करणारे पत्रही निवडणूक आयोगाला पाठवल्याची माहिती छेडा यांनी दिली; मात्र त्या मागणीवर अद्याप कार्यवाही झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली. ऐन निवडणुकीच्या काळात मतदार याद्यांतून इमारतीच्या इमारती गायब कशा होतात, याबाबत छेडा यांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे.

Post Bottom Ad