मुंबई - अंगणवाडी कर्मचार्याना दिवाळी पूर्वी भाऊबिजेची रक्कम आणि थकित रक्कम द्यावी व राज्य सरकारने १ एप्रिल २०१४ रोजी पासून केलेल्या मानधन वाढीची रक्कम दिवाळी पूर्वी द्यावी अश्या मागण्यांसाठी आह शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेत सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी काम करत आहेत. त्यांचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. याचा तातडीने विचार करून या अल्प मानधन मिळणार्या कर्मचार्यांना न्याय द्यावा, अशीही मागणी या संघटनेतर्फ़े करण्यात आली आहे.
या कर्मचार्याना शासनाकडून अल्प मानधन दिले जाते. परंतु हे मानधनही वेळेवर दिलेले नाही . यामुळे हे थकित मानधन दिवाळी पूर्वी देण्यात यावे. तसेच या कर्मचार्यांना १००० रुपये इतकी भाऊबीज देण्यात येते . यावर्षी सुद्धा हि भाऊबिजेचि रक्कम दिवाळी पूर्वी द्यावी तसेच १ एप्रिल रोजी पासून अंगणवाडी कर्मचार्यांच्या मानधनात वाढ केली आहे . परंतु या अंगणवाडी सेविकांना अजून ही रक्कम दिलेली नसल्याने ही रक्कम दिवाळी पूर्वी देण्यात यावी अशी मागणीही या संघटनेने केलेली आहे