मुंबई- मतदारांना भुरळ घालण्यासाठी पैसे मोजून वृत्तपत्रांत बातम्या छापून आणल्याचा ठपका ठेवून मुंबई आणि ठाण्यातील 56 उमेदवारांना निवडणूक आयोगाने "कारणे दाखवा‘ नोटिसा पाठवल्या आहेत. त्यांत मुंबई शहर जिल्ह्यातील आठ, मुंबई उपनगर जिल्ह्यातील 12 आणि ठाणे जिल्ह्यातील आठ उमेदवार आहेत. विशेष म्हणजे, उपनगर जिल्ह्यातील सात उमेदवारांच्या बातम्या "पेड न्यूज‘ असल्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतला आहे.
"पेड न्यूज‘ला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ही समिती वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांतील बातम्यांवर नजर ठेवत होती. त्यानुसार मुंबई शहरातील आठ उमेदवारांच्या वृत्तपत्रांत छापून आलेल्या बातम्या संशयास्पद आढळल्या आहेत. यासंदर्भात कॉंग्रेसचे अमिन पटेल, मनोज जामसुदकर, सुसीबेन शहा, मधु चव्हाण, मनसेचे नितीन सरदेसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रसाद लाड, शिवसनेचे अरविंद दुधवडकर आणि मकरंद नार्वेकर यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
मुंबई उपनगर जिल्ह्यात सुमारे 40 उमेदवारांना नोटिसा पाठवण्यात आल्या. त्यापैकी सात उमेदवारांच्या बातम्या "पेड न्यूज‘ असल्याचा निर्णय समितीने घेतला आहे. यामध्ये रईस लष्करिया (मनसे, अंधेरी पश्चिम), मोहित कंबोज (भाजप, दिंडोशी),राजहंस सिंह (कॉंग्रेस, दिंडोशी), डॉ. विनय जैन (शिवसेना, मालाड), शशिकांत पाटकर (शिवसेना, विलेपार्ले), पराग आळवणी (भाजप, विलेपार्ले), तुकाराम काते (शिवसेना, अणुशक्ती नगर) यांचा समावेश आहे.