मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील देखभाल व दुरुस्ती कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाइनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर नेरूळ ते मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.
मेन लाइनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३.३0 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यानची डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक सकाळी १0.३९ ते दुपारी ३.२२ वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे. त्यामुळे डाऊन धिम्या मार्गावरील लोकल गाड्या कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर आणि ठाकुर्ली या स्थानकांवर थांबणार नाहीत. तसेच सीएसटीवरून डाऊन जलद मार्गावरून सुटणार्या सर्व लोकलला सकाळी १0.0८ ते दुपारी २.४0 वाजेपर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे.
त्यामुळे या लोकल गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १५ ते २0 मिनिटे उशिराने धावणार आहेत. सकाळी १0.५0 ते दुपारी ३.३६ या वेळेत ठाण्याहून सीएसटीसाठी सुटणार्या अप जलद मार्गावरील लोकल गाड्यांना मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवर थांबा देण्यात आल्यामुळे त्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. तसेच ब्लॉकदरम्यान सीएसटीला येणार्या आणि जाणार्या धिम्या मार्गावरील सर्व लोकल सकाळी १0 ते दुपारी ४ या वेळेत आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत.
हार्बर मार्गावर नेरूळ ते मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. सकाळी १0.१२ ते दुपारी ३.0४ वाजेपर्यंत नेरूळ ते मानखुर्द स्थानकांदरम्यानची अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते मानखुर्द आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी १0 ते दुपारी ४ वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर आणि मेन लाईनने प्रवास करू शकतात.मरे-परेवर उद्या ब्लॉकगोंधळचर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक
उपनगरीय रेल्वेच्या दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान रविवारी जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १0.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यानची अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक अप आणि डाऊन धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे. तसेच काही उपनगरीय लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.