मुंबई उपनगर जिल्ह्यात 380 उमेदवार निवडणूक रिंगणात- जिल्हाधिकारी शेखर चन्ने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2014

मुंबई उपनगर जिल्ह्यात 380 उमेदवार निवडणूक रिंगणात- जिल्हाधिकारी शेखर चन्ने

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी 380 उमेदवार रिंगणार आहेत, अशी माहिती मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर चन्ने यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

दि. 31 जुलै ते 17 सप्टेंबर, 2014 पर्यंतच्या कालावधीमध्ये 83,771 मतदारांची मतदार यादीत नोंद झाली आहे. आता मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण 77 लाख 41 हजार 930 मतदार असून पुरुष 42 लाख 64 हजार 851 तर महिला मतदारांची संख्या 34 लाख 76 हजार 943 आहे. अन्य 136 मतदार आहेत.


मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण 7346 मतदान केंद्रे असून 15 पेक्षा जास्त उमेदवार असणाऱ्या मतदार संघात अतिरिक्त बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहेत. 157-भांडुप (पश्चिम), 169-घाटकोपर (पश्चिम), 171-मानखुर्द शिवाजीनगर, 174-कुर्ला (अ.जा.), 175-कलिना, 176-वांद्रे (पूर्व), 159-दिंडोशी, 163-गोरेगाव या ठिकाणी डबल बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहेत.

दि. 8 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण वोटर स्लीप वितरणाचे काम पूर्ण होण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भिंती विद्रुपीकरणाची 1020, पोस्टर 661, बॅनर 1521 आणि अन्य 1157 अशी 4359 प्रकरणांची नोंद घेण्यात आली असून ते सर्व विद्रुपीकरण काढून टाकण्यात आले आहे. एका प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. खाजगी विद्रुपीकरणाची 301 प्रकरणे असून ती सर्व काढून टाकण्यात आली आहेत. ध्वनिक्षेपण यंत्राचे एक प्रकरण असून त्या संदर्भात एफ.आय.आर.दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर सभा/ भाषणे आदि 2 प्रकरणे असून त्यावर एफ.आय.आर.दाखल करण्यात आला आहे.

आतापर्यंत पेडन्युजचे एकही प्रकरणे आढळले नाही. आतापर्यंत एकूण 50 लाख 26 हजार 600 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर 4810 रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले आहे. वांद्रे (पश्चिम) येथे 35,25,000 ची रक्कम दि.28 सप्टेंबरला जप्त करण्यात आली असून 12 लाख 50 हजारांची रक्कम मालाड येथून दि.30 सप्टेंबरला जप्त करण्यात आली आहे. तक्रार कक्षात आतापर्यंत 191 लोकांनी दूरध्वनी केले असून बहुतेक प्रकरणे मतदार यादीबद्दल चौकशीची आहेत. 3 तक्रारी बॅनर लावल्याबद्दल असून 1 तक्रार आचारसंहितेच्या कालावधीत लादी लावण्याबद्दल आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात भरारी पथके 78, स्टॅटीस सर्व्हिसेस टीम 78, व्हिडिओ रेकॅार्डिंग 51 व व्हिडिओ व्हिविंग 35 पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

राज्य शासनाचे 4588, केंद्र शासनाचे 3069, प्राथमिक शाळांचे 7945, माध्यमिक शाळांचे 11672, ज्युनिअर कॅालेजचे 1475, महाविद्यालयाचे 2829, शैक्षणिक संस्थांचे 10696 कर्मचारी निवडणुक कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्याशिवाय बँक व एल.आय.सी., एम.टी.एन.एल./बी.एस.एन.एल., स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, म्हाडा, बेस्ट, एम.एस.इ.बी., ऑईल कंपनी यांचे मिळून निवडणुक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 43,024 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे याची खात्री करावी. व योग्य त्या मतदान केंद्रावर जावून मतदान करावे. असे आवाहन चन्ने यांनी केले. त्यांनी सांगितले  की, ज्या मतदारांना त्यांच्या घरी Voter Slip मिळाल्या नाहीत त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर Voter Slip दिल्या जातील.


Post Bottom Ad