पंतप्रधान कार्यालयाचा इंटरनेट स्पीड 34 एमबीपीएस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 October 2014

पंतप्रधान कार्यालयाचा इंटरनेट स्पीड 34 एमबीपीएस

मुंबई - भारताच्या पंतप्रधान कार्यालयाचा इंटरनेट स्पीड हा 34 एमबीपीएस आहे; तर संपूर्ण देशभरात इंटरनेटचा सरासरी स्पीड हा अवघा 2 एमबीपीएस असल्याची माहिती समोर आली आहे. ऑनलाइन आरटीआय डॉट कॉमचे सहसंस्थापक विनोथ रंगनाथन यांनी माहिती अधिकाराअंतर्गत दाखल केलेल्या अर्जाच्या माध्यमातून ही माहिती मिळवली आहे. सध्या पंतप्रधान कार्यालयाला नॅशनल इन्फॉर्मेटिक्‍स सेंटरमार्फत (एनआयसी) इंटरनेट सेवा पुरवली जाते. 

कोचीमधील खेड्यांमध्येही पंतप्रधान कार्यालयाच्या 30 पट वेगाने इंटरनेट 1 जीबीपीएस वेगाने उपलब्ध आहे; तर अमेरिकेतही गुगल फायबर कनेक्‍शनने 1 जीबीपीएस वेगाने इंटरनेटची उपलब्धतता सर्वसामान्य नागरिकांनाही उपलब्ध असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. इंटरनेट कन्टेन्ट डिलिव्हरी नेटवर्क अकमईने केलेल्या अभ्यासानुसार, भारतातील सरासरी इंटरनेटचा वेग हा 2 एमबीपीएस इतका आहे; तर इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारताचा जगभरात 115वा क्रमांक लागतो, असेही आकडेवारीतून समोर आले आहे. जगभरात दक्षिण कोरिआत 24.6 एमबीपीएस इतका सर्वाधिक सरासरी इंटरनेटचा स्पीड आहे. माहिती अधिकारातील आकडेवारीतून नुकत्याच जाहीर झालेल्या डिजिटल इंडिया प्रकल्पासमोर मोठी आव्हाने असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मोहिमे अंतर्गत 2019 अखेरपर्यंत खेड्यांमध्ये हाय स्पीड इंटरनेट एक्‍सेस उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य आहे.

Post Bottom Ad