मुंबई : आचारसंहिता भंगाच्या कोणत्याही स्वरुपाच्या तक्रारींसाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत टोल फ्री दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आचारसंहिता भंगाबाबत कोणालाही तक्रार करावयाची असल्यास 1800221951 हा टोल फ्री क्रमांक 24x7 उपलब्ध आहे. याशिवाय mumbaielectionmcc@gmail.com या ई-मेल द्वारे देखील आचासंहिता भंगाची तक्रार दाखल करता येईल. तसेच तक्रारींचा तपशील www.electionmumbaicity.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आचारसंहिता पालन करण्याच्या दृष्टीने मुंबई शहरातील दहा मतदारसंघामध्ये भरारी पथके, स्थिर दक्षता पथके, व्हिडीओ दक्षता पथके, व्हिडीओ टेहळणी पथके आणि तक्रार सनियंत्रण कक्ष तैनात करण्यात आले आहेत. त्याद्वारे उमेदवारांच्या प्रचारसभा, प्रचारफेऱ्या इत्यादींवर अत्यंत बारकाईने नजर ठेवण्यात येत असून कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची तात्काळ दखल घेवून त्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यात येणार आहे. उपरोक्त कामाकरिता सुमारे दोनशेहून अधिक कर्मचारी / अधिकारी तसेच पोलीस यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे. आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही, याची सर्व राजकीय पक्ष तसेच उमेदवारांनी दक्षता घ्यावी, असे मुंबई शहर जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. | |
Post Top Ad
02 October 2014
Home
Unlabelled
आचारसंहिता भंगाच्या तक्रारींसाठी 1800221951 टोल फ्री क्रमांक
आचारसंहिता भंगाच्या तक्रारींसाठी 1800221951 टोल फ्री क्रमांक
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.