भारतातील जवळपास ४0 कोटी जनता उपासमारीने त्रस्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 October 2014

भारतातील जवळपास ४0 कोटी जनता उपासमारीने त्रस्त

नवी दिल्ली : भारताने मंगळ ग्रहापर्यंत मजल मारली असली तर देशातील कोट्यवधी जनतेला आजही एकवेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे दाहक वास्तव जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने पुढे आले आहे. एका आकडेवारीनुसार, जगभरातील ८0 कोटींहून जास्त जनतेला दोन वेळचे जेवण मिळत नाही. जगातील प्रत्येक आठवी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे उपासमारीने त्रस्त आहे. भारत, पाकिस्तान व बांगलादेशातील जवळपास ४0 कोटी जनता उपासमारीने त्रस्त आहे. यातील निम्मी म्हणजे सुमारे १९ कोटी (१९0.७ दशलक्ष) भारतीयांना आजही आपली पोटाची आग शमविण्यासाठी अविरत संघर्ष करावा लागतो. 

विशेष म्हणजे या देशांतील अन्नधान्याची कोठारे खाद्यान्नाने ओसंडून वाहत असताना ही विदारक स्थिती पहावयास मिळत आहे. परिणामी, जगाने गुरुवारी 'जागतिक अन्न दिन' मोठय़ा उत्साहाने साजरा केला असला तरी, ही आकडेवारी कोणत्याही संवेदनशील व्यक्तीचे मन हेलावून टाकण्यास पुरेशी आहे. सव्वा अब्ज लोकसंख्या असलेल्या भारतातील २६९ दशलक्ष जनता अद्याप दारिद्रय़रेषेखाली आहे. ही लोकसंख्या इंडोनेशियाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा कितीतरी जास्त आहे. याचा अर्थ देशातील २६ कोटी ९0 लाख लोकांना आजही आपले पोट भरण्यासाठी पैसे मिळत नाहीत. या लोकांच्या जीवनमानात आजतागायत कोणतीही सुधारणा झालेली नाही.

Post Bottom Ad