बेस्ट कामगारांना सानुग्रह अनुदान द्या ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 September 2014

बेस्ट कामगारांना सानुग्रह अनुदान द्या !

मुंबई :  सन २०१३-१४ सालासाठी बेस्ट मधील कामगाराना बोनस एवजी सानुग्रह द्यावे, अशी मागणी बेस्ट जागृत कामगार संघटनेने महापौर स्नेहल आंबेकर यांच्याकडे केली आहे. पालिकेतील कामगाराना दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. परंतु बेस्टच्या कामगारांच्या संदर्भात अजूनही कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे सार्वजनिक उपक्रमातील कामगारांच्या बोनस एवजी सानुग्रह अनुदान अथवा दिवाळी सणाच्या निमिताने आर्थिक भेट हि हक्काची बाब झाली आहे. त्यामुळे बेस्टच्या कामगाराना सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी बेस्ट जागृत कामगार संघटनेने केली आहे . 

Post Bottom Ad