रेल्वेची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 September 2014

रेल्वेची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित

मुंबई - पश्‍चिम रेल्वेचे नवीन वेळापत्रक सप्टेंबरपासून लागू झाले आहे. यासंदर्भात प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तिकेत रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने आवश्‍यक सुविधांसोबत विविध महत्त्वपूर्ण गाड्यांच्या वेळा, रेल्वे प्रवासाविषयीची माहिती; तसेच अन्य माहितीही आहे. पश्‍चिम रेल्वेद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तिकेत पश्‍चिम, मध्य, उत्तर पश्‍चिम, पश्‍चिम मध्य व इतर चार विभागीय रेल्वेंविषयीची माहिती आहे. 


देशातील सर्व महत्त्वपूर्ण गाड्यांची माहिती, पश्‍चिम भारतातील महत्त्वपूर्ण स्थळे व पर्यटन स्थळे, संपूर्ण भारतीय रेल्वे व पश्‍चिम रेल्वेचे नकाशेही यात आहेत. दुरंतो, राजधानी, शताब्दी, जनशताब्दी, संपर्क क्रांती ट्रेन याबाबतची माहितीही आहे. आरक्षण, प्रवासातील सुविधा, सवलती, तिकीट रद्द केल्यानंतर पैसे परत मिळण्याबाबतचे नियम, सामान आरक्षित करण्याचे नियम, मालवाहक व गट आरक्षणाबाबतची माहिती, फलाट तिकीट, चोरी, एफआयआर दाखल करण्याबाबतचे अर्ज, खाद्यपदार्थ व त्यांचे दर, रेल्वेस्थानकांवरील सुविधा, माहितीचा अधिकार, रेल्वेच्या विश्रामगृहांच्या दरांबाबतची माहिती यात आहे, असे पश्‍चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी सांगितले.

Post Bottom Ad