प्राधिकरणाच्या सदस्यपदी सुधाकर वड्डे, बाबाजी जाधव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 September 2014

प्राधिकरणाच्या सदस्यपदी सुधाकर वड्डे, बाबाजी जाधव

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अशासकीय सदस्यपदी सुधाकर वड्डे व बाबाजी जाधव यांची शासनाने नियुक्ती केली आहे. म्हाडाचा प्रादेशिक घटक असलेल्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अशासकीय सदस्यपदी श्रीरंग देठे, क्लॉईड क्रास्टो, दिलीप राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम १९७६ च्या कलम १८ च्या अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून मुंबई इमारत दुरुस्ती व पूनर्रचना मंडळाची स्थापना केली होती. या अधिनियमाच्या कलम १८ च्या उपकलमे २, ३, ४ अन्वये शासनाला प्रदान केलेल्या अधिकाराचा आणि त्यास सर्मथ करणार्‍या इतर सर्व अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Post Bottom Ad