मुंबईत ध्वनिप्रदूषणात वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 September 2014

मुंबईत ध्वनिप्रदूषणात वाढ

मुंबई - नाशिक, पुणेरी ढोलचे मुंबईत वाढत चाललेले फॅड आणि जोडीला डीजेचा दणदणाट यामुळे शहरातल्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीतला आवाज मागील वर्षीच्या तुलनेत वाढल्याचे समोर आले. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई आदी ठिकाणच्या ध्वनिप्रदूषणात वाढ झाली; तर काही ठिकाणी तुलनेने घट झाली. 
राज्यात सर्वाधिक ध्वनिप्रदूषणाची नोंद पुण्यामध्ये महात्मा फुले मंडईत सरासरी 113 डेसिबल इतकी झाली. या ठिकाणचे कमाल ध्वनिप्रदूषण 119; तर किमान 110 डेसिबल इतके होते. मागील वर्षी येथील सरासरी ध्वनिप्रदूषण 101 डेसिबल इतके होते. पुण्यातल्या अन्य चार ठिकाणचा कमाल आवाज 100 डेसिबलच्या वर गेला होता. 

राज्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाने आवाजाच्या पातळीची नोंद केलेल्या एकूण 88 ठिकाणांपैकी 25 ठिकाणे मुंबईतली आहेत. मंडळ यासंबंधीचा अहवाल राज्य सरकार, स्थानिक महानगरपालिका, तसेच गृह खात्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वैज्ञानिक अधिकारी एस. सी. कोल्लूर यांनी सांगितले. 

ध्वनीप्रदूषणाची मर्यादा डेसिबलमध्ये 
क्षेत्र - दिवसा - रात्री 
रहिवासी संकुल - 55 - 45 
व्यावसायिक - 65 - 55 
शांतता क्षेत्र - 50 - 40 

नीप्रदूषण डेसिबलमध्ये- 
मुंबई : - 
ठिकाण - 2014 - 2013 
अंधेरी - 82 - 67 
बोरिवली - 90 - 76 
भांडुप - 70 - 56 
भायखळा - 83 - 68 
चेंबूर पश्‍चिम - 73 - 64 
चिंचपोकळी - 84 - 67 
दादर - 83 - 68 
गिरगाव चौपाटी - 84 - 71 
जुहू चौपाटी - 79 - 83

Post Bottom Ad