मुंबई ; मुंबई महानगर पालिकेच्या मुख्यालयातच कोणतेही परवाने नसताना चालवल्या जाणार्या कॅन्टीनच्या बातमीची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री कार्यालय तसेच मुंबईच्या महापौरांनी गंभीर दाखल घेऊन योग्यती कारवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
महानगर पालिकेच्या मुख्यालयात मे. व्हि. एन. कॅटरर्स कडून कॅन्टीन चालवण्यात येत आहे. या कॅन्टीनला आरोग्य विभाग, दुकाने व आस्थापना, फायर डीपारमेंटचे परवाने नसतानाही कॅन्टीन चालवण्यात येत आहे. २०१३ पासून बेकायदेशीर पणे चालवल्या जाणार्या या कॅन्टीनवर सोमवारी धाड टाकून `ए`विभागाच्या आरोग्य विभागाने नोटीस बजावली आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने घेऊन नगर विकास विभागचे सचिव श्रीकांत सिंग यांना योग्य ती कारवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी याबाबत `ए` विभागाच्या अधिकार्यांना बोलावून नियमानुसार योग्यती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. वेळ पडल्यास नियामानुसार आतापर्यंतचा दंड वसूल केला जाईल असेही आंबेकर यांनी सांगितले आहे .