शिवसेनेने जागावाटपाचा तिढा सन्मानजनक मार्गाने सोडविला नाही, तर स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत गुरुवारी भाजपने दिले. राज्यातील पूर्ण २८८ जागा लढण्यासाठी आमची तयारी असून, निकालानंतर सरकार स्थापन करण्यासाठी जागा कमी पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचीही तयारी भाजपने दाखविली आहे. त्यासाठी आतापासूनच 'घड्याळाला किल्ली' देण्याचे प्रयत्नही भाजपने चालवले आहेत.राज्यात स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याची सर्वप्रकारची तयारी भाजपने केली आहे.
शिवसेनेसोबत महायुती केल्याने, शिवसेनेसोबतची युती संपुष्टात आणून अन्य चार पक्षांच्या मदतीने स्वबळावर लढल्याने, तसेच मनसेसोबत निवडणूकपूर्व युती केल्याने काय लाभ होतील, याविषयी अंतर्गत सर्वेक्षणे भाजपने केली आहेत. त्यात शिवसेनेशिवाय लढल्यास भाजपला १२० ते १४० जागा मिळतील, तर मनसेसोबत लढल्याने बहुमतासह सत्तेत येण्याची शक्यता नसल्याचे नमूद केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.चार मित्रपक्षांच्या मदतीने निवडणूक लढून १२० ते १४० जागा जिंकल्यास निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या समर्थनाने सरकार स्थापणे शक्य होईल, असे भाजपच्या उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे आहे. याविषयी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांशी बोलणीही झाल्याचा दावा सूत्रांनी केला. गेल्या ३० वर्षांपासून युती असलेल्या शिवसेनेचे ओझे उतरवण्याची हीच सुवर्णसंधी असल्याची भाजपला खात्री पटली असून, त्याचदृष्टीने महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच निर्माण केल्याचे म्हटले जात आहे.
भाजपच्या गोटात सुरू असलेल्या 'संशयास्पद' हालचालींमुळे छोट्या मित्रपक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपचे नेमके इरादे काय आहेत, याचा कानोसा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, रिपाइं नेते रामदास आठव ले तसेच महादेव जानकर घेत असल्याचे समजते. या छोट्या पक्षांपैकी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष हे प्रामुख्याने राष्ट्रवादीच्या विरोधात जन्माला आलेले आहेत. राष्ट्रवादीशी सुरू असलेल्या भाजपच्या छुप्या मैत्रीची कुणकुण लागल्याने भाजपशी निवडणूकपूर्व युती करण्याविषयी ते साशंक आहेत. भाजप व पवार यांची निवडणुकीनंतर हातमिळवणी होणार असेल, तर आम्हाला आताच भाजपशी संबंध तोडावे लागतील, असे छोट्या पक्षांच्या एका ज्येष्ठ नेत्याने 'महाराष्ट्र टाइम्स'ला सांगितले. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी भाजपमधील अंतर्गत विरोधाला न जुमानता राष्ट्रवादीविरोधी छोट्या पक्षांना एकत्र आणले होते. आता त्या भावनेला भाजपनेते हरताळ फासणार असतील भाजपशी युती करण्यात आम्हाला मुळीच स्वारस्य नाही, असे या नेत्याने सांगितले.