छ. शिवाजी मंडईचा वीज, पाणी पुरवठा त्वरित सुरू करा - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 September 2014

छ. शिवाजी मंडईचा वीज, पाणी पुरवठा त्वरित सुरू करा - मुख्यमंत्री

मुंबईतील फोर्ट परिसरातील छत्रपती शिवाजी मासे मंडईतील वीज आणि पाणीपुरवठा त्वरित सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना दिले. त्याचप्रमाणे या इमारतीचे वरचे चार मजले पाडण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. 

या मंडईतील मासे व्यापार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या मंडईची पाच मजली इमारत जुनी झाली असून तिचे वरचे चार मजले पाडण्याचा निर्णय या बैठकीत झाला. वरचे चार मजले पाडून तळजल्याचा धोका कमी करण्यात येणार आहे. तळमजल्यावरील मासे मंडई सध्या आहे तेथेच ठेवण्यात येणार आहेत. या मंडईच्या जवळच असलेल्या महात्मा फुले मंडईत घाऊक मासे मंडईसाठी नवीन इमारत बांधली जाईल आणि सध्याचे छत्रपती शिवाजी मासे मंडई या नवीन इमारतीत कायमस्वरूपी स्थलांतरित करण्यात येईल. त्यानंतर सध्याच्या मच्छी मार्केटच्या जागी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात तळमजल्यावरील बंद केलेला वीज आणि पाणीपुरवठा सुरु करण्याची व्यापारी शिष्टमंडळाची मागणी चव्हाण यांनी मान्य केली.

छत्रपती शिवाजी मासे मंडईतील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बळवंतराव पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पाटील, उपाध्यक्ष रमेश सिंग, शौकत अली, सचिव विलास पाटील, सदस्य राजाराम पाटील, प्रदीप लोखंडे आदींनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना समस्यांबाबतचे निवेदन दिले व चर्चा केली. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. या बैठकीला महानगरपालिकेचे आयुक्त (अ.का.) राजीव जलोटा, अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख, उपायुक्त (विशेष) राजेंद्र वळे, सहायक आयुक्त रमेश पवार आदी उपस्थित होते.

Post Bottom Ad