४ महिन्यानंतरही गुन्हे दाखल नाहीत
ठाणे / पूनम पोळ
ठाणे बांधकाम मंडळाच्या अख्यातारीतील जव्हार बांधकाम विभागात न बुजविलेल्या खड्ड्यांच्या कामावर कोट्यावधी रुपये काढून शासकीय रकमेचा अपहर होऊन ४ महिने झाले तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्यानेच या घोटाळ्यात अजून गुन्हे दाखल होत नसल्याने शासनाच्या भूमिकेविषयी संशय निर्माण झाला आहे.
जव्हार बांधकाम विभागातील वाद व विक्रमगड उपविभागात उन्हाळी नावाने मंडळ कार्यालायातुन जोब मंजुरीच नव्हती तरीदेखील ४२ कामे केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे . प्रत्यक्ष कामाचा तर अंशही तिथे नव्हता. मार्च एन्डच्या नावाने दरवर्षीप्रमाणे यंदाही २० मे ला शासनाकडून या कामावर निधी खर्च झालां मर्जीतील ठेकेदार असलेल्या शहापूर तालुक्यातील मंजूर संस्था आणि एजन्सीच्या नावे १ कोटी ३७ रुपयांचे धनादेशही देण्यात आले. विशेष म्हणजे इतके होईपर्यंत विभागाच्या वरिष्ठ लेखाधीकार्याना सुतराम कल्पना नव्हती. जेव्हा हि बाब उघडकीस आली तेव्हा त्यांनाच धक्का बसल्याचे लेखाधिकारी जी.डी. ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्य अभियंता, मुंबई यांच्या आदेशानुसार एफ. आर. खान या ठाणे विभागाच्या लेखाधीकार्यानी केलेल्या चौकशीत गंभीर बाबी उघडकीस आल्या असून या खड्डे घोटाळ्यात कार्यकारी एफ. वाय. शंकपाळे, सहाय्यक अभियंता आणि मुख्य अभियंता दिनेश होले, वरिष्ठ लेखा लिपिक, निविदा लिपिक आणि लेखा परिक्षक यांचा समावेश आढळून आला आहे.
२० मे रोजी वरिष्ठ लेखाधिकारी यांनी बनावट स्वाक्षरी दिलेले हे ६ धनादेश रद्द करण्याबाबत पत्राने कळविलेल्या ठाणे बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता अनिल गायकवाड यांनी फ़ौजदारी गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करून भ्रष्टाचारी अभियंत्यांना पाठीशी घातले आहे. तसेच जव्हार बांधकाम विभागातील खड्डे घोटाळ्यातील संशयित दिनेश होले याला २००७ साली मुरबाड रोजगार हमी घोटाळ्यात निलंबित करण्यात आले आहे.