मुंबई -:(वार्ताहर) -: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूकआयोग कधी जाहीर करणार याकडे सगळ्याच पक्षांचे लक्ष लागलेले असताना सध्या सायन कोळीवाडा येथील कॉंग्रेसचे आमदार जगन्नाथ शेट्टी चांगलेच अडचणीत आले आहेत. खोटे कागदपत्रे व माहिती देऊन निवडणूकआयोगालाफसवले असून म्हाडालाही खोटी माहिती देऊन वर्सोवा येथे म्हाडाचा रूम मिळवल्याचा आरोप चेंबूरमधील सामाजिक कार्यकर्ते कुमार अय्यर यांनी केला आहे तर याबाबत त्यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
आमदार जगन्नाथशेट्टी यांनी २००४ व २००९ मध्ये दोनदा निवडणूकलढवली होती त्यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगास वास्तव्याचीखोटी माहिती दिली होती त्याचप्रमाणे १२ जून २००९ मध्ये त्यांनीम्हाडामध्ये निवासी गाळा मिळवण्यासाठी अति उच्चउत्पन्न गटामध्ये अर्ज केला होता त्यात त्यांनी शिवप्रसाद, मट्टाळ, जिल्हा, उडपी हा निवासी पत्ता नमूदकरून मुंबईत त्यांचे कोणतेही वास्तव्य नसल्याचे दाखवले. मात्र अर्जासोबत जोडण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात शिवनंदन बी, १६ / २३३ राजावाडी कॉलनी घाटकोपर पूर्व असा पत्ता नमूद केलाव त्यात सोबत शिधावाटप पुस्तिका जोडली. शिधावाटप पुस्तिकेत जो पत्ता नमूद केला आहे तो पत्ता राजावाडी कॉलनीमध्ये कोठेही अस्तित्वात नाही त्यामुळे शिधावाटप पुस्तिका बनावट असल्याचे आढळून येत आहे. त्याच प्रमाणे त्यांनी म्हाडाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीमध्ये तफावत असल्याचे पुढे आले असून तरीही म्हाडाने त्यांना २० ऑगस्ट २००९मध्ये राजयोग गृहनिर्माण संस्था वर्सोवा अंधेरी येथे निवासी सदनिका मंजूर केली. चेंबूरमधील सामाजिक कार्यकर्ते कुमार अय्यर यांनी माहिती अधिकारातून मागवलेल्या माहितीतून उघड झाले असून त्यांनी आमदार जगन्नाथशेट्टी यांच्याविरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. त्याचप्रमाणे मंगळवारी बांद्राच्या एमआयजी क्लबमध्ये अय्यर यांनी पत्रकार परिषदघेतली असून त्यामध्ये आमदार शेट्टी यांच्या विरोधात ते आणखीन काही पुरावे सादर करणार आहेत