मुंबई - नवनियुक्त महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासाठी महासभेतील पहिलाच दिवस वादाचा ठरला. उपमहापौरपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभागृहात आले. त्याला विरोधकांनी आक्षेप घेतला; मात्र महापौरांनी निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवल्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने बहिष्कार घातला. ही निवडणूक प्रक्रिया नियमबाह्य असून, निवडणूक रद्द करून महापालिका चिटणीसांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी विरोधकांनी केली.
महापौरपदी आंबेकर यांची निवड झाल्यावर उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी त्या पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहत होत्या. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतील हात उंचावून मतदान करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच अचानक उद्धव ठाकरे यांनी सभागृहात येऊन आंबेकर यांचे अभिनंदन केले. निवडणूक सुरू असताना पक्षाच्या प्रमुखांनी सभागृहात येणे अयोग्य आहे, असा आक्षेप घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर आणि राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी निवडणूक रद्द करण्याची मागणी केली; मात्र या आक्षेपाला न जुमानता आंबेकर यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवल्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहात घोषणाबाजी सुरू केली; तरीही महापौर दाद देत नसल्याने विरोधकांनी निवडणुकीवरच बहिष्कार घातला.
निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना पक्षप्रमुखांनी सभागृहात येणे महापालिकेच्या प्रथेला धरून नाही, त्याचबरोबर पिठासीन अधिकारी असताना महापौरांनी शिवसेनेचे उपरणे खांद्यावर घेणेही अयोग्य आहे. त्यामुळे उपमहापौरपदाची निवडणूक रद्द करून फेरनिवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली. कामकाज चालवण्याबाबत महापौरांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी चिटणीसांची आहे; मात्र त्यांनी ही जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली नाही. त्यामुळे त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी आयुक्तांकडे करणार असल्याचेही देवेंद्र आंबेरकर यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी या वादावर बोलणे टाळले. सभागृहातील शिवसेनेचे सदस्यच विरोधकांना सणसणीत उत्तर देतील, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
या प्रकरणावरून शिवसेना चांगलीच अडचणीत येणार असल्याचे दिसताच बाजू सावरण्यासाठी माजी महापौर सुनील प्रभू धावले. हात उंचावून मत देण्याची प्रक्रिया संपली होती. त्यानंतर आवाजी पद्धतीने मत नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होणार होती. या वेळी ठाकरे यांनी सभागृहात प्रवेश केला, असा दावा त्यांनी केला. विरोधकांची लेखी तक्रार मिळाल्यावर त्याबाबत उत्तर देऊ, असे चिटणीस नारायण पठाडे यांनी सांगितले.
ठाकरेंवर भाजप नाराज
शिवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांनी सभागृहात येऊन महापौरांना शुभेच्छा देण्याबाबत विरोधकांनी शिवसेनेवर आसूड ओढलेले असतानाच भाजपनेही नाराजी व्यक्त केली. "ठाकरे यांनी उपमहापौरांनाही पुष्पगुच्छ दिला असता, तर बरे झाले असते,‘ असे मुंबई भाजपचे अध्यक्ष ऍड. आशीष शेलार म्हणाले.