पालिकेचे सफाई कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 September 2014

पालिकेचे सफाई कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

मुंबई :  मुंबई महानगर  पालिकेच्या माटुंगा येथील जी / दक्षिण विभागातील घन कचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कर्मचार्यांचे विविध समस्यांमुळे हाल होत आहेत. याबाबत सातत्याने सहाय्यक आयुक्तान सोबत बैठका होऊनही कर्मचार्यांचे प्रश्न  सुटले नसल्याने सफाई कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

जी/दक्षिण विभागातील घन कचरा व्यवस्थापन विभागात ८ लिपिक कार्यरत आहेत . या लिपिकांना दोन कर्मचारी मदतनीस म्हणून द्यावेत असे आदेश आदेश असताना पात्रता नसलेल्या ८ कर्मचार्यांना मदतनीस म्हणून घेतले आहे. या लिपिक व मदतनिसानकडून रजेचा पगार, नैमित्तिक रजेचा पगार, थकबाकी, वारसांची नोंद करणे, कालबद्ध पदोन्नती , पेन्शन, ग्रज्युटी इत्यादी कामांसाठी सफाई कर्मचार्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे. 

सहाय्यक अभियंता ( पर्या.) यांची नेमणूक झाल्यापासून जी/ दक्षिण विभागातील हजेरी चौक्यांची दुरवस्था झाली आहे. सफाई कर्मचार्यांना चौक्यांवर सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्त्याने सहाय्यक अभियंता ( पर्या.)  यांच्याकडे करूनही  दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. याबाबत जी/ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त केशव उबाळे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकलेला नाही.   

Post Bottom Ad