मुंबई : बृहनमुंबई महानगर पालिकेच्या सर्व विभागातील कर्मचारी व अधिकारी वर्गाकरता म्हाडाच्या गृह प्रकल्पांमध्ये राखीव कोटा देण्याची मागणी तत्कालीन महापौर सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांकडे डिसेम्बर मध्ये केली होती. यावर गृहनिर्माण मंत्री सचिन अहीर यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून म्हाडाला आवश्यक सुचना दिल्या असल्याचे माजी महापौर सुनील प्रभू यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
म्हाडाच्या गृह प्रकल्पपातर्गत ह्या योजनेचा फायदा पालिकेतील सर्व विभागातील कर्मचार्यांना होऊ शकतो असे ते यावेळी म्हणाले. पालिकेच्या मुख्यालयात आणि विविध विभागांतील कार्यालयांमध्ये सद्यस्थितीत एकूण सव्वा लाख कर्मचारी कामकाज करतात त्यामुळे याचा फायदा त्यांना होईल असेही ते यावेळी म्हणाले. परंतु अजून किती टक्के त्यांना कोटा राखीव ठेवायचा असा निर्णय अजून झाला नसून लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येईल असेही प्रभू यावेळी म्हणाले.