मुंबई : विधानसभा – २०१४ च्या निवडणुकीकरिता आचारसंहिता लागू असल्याने, बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये सोमवार, दिनांक ०६ ऑक्टोबर, २०१४ रोजी लोकशाही दिनाचेआयोजन करण्यात येणार नाही, असे महापालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे .
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी महापालिकेत लोकशाही दिनाचेआयोजन करण्यात येते. तथापि, महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक प्रसुधा २०११ / प्र. क्र. १८९ / ११ / १९ – अ, दिनांक २६.०९.२०१२ मधील बाब क्रमांक ५.७ नुसार, विधानसभा २०१४ च्या निवडणुकीकरिता आचारसंहिता लागू करण्यात आलेली असल्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा दिनांक ०६ ऑक्टोबर, २०१४ रोजी (पहिला सोमवार) नियोजित लोकशाही दिन आता आयोजित करता येणार नाही, याची सर्व नागरिकांनी आणि संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.