आमदार अशोक जाधवांचा ई-मेल हॅक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 September 2014

आमदार अशोक जाधवांचा ई-मेल हॅक

मुंबई : आमदार अशोक जाधव यांचा ई-मेल हॅक करून हॅकर्सकडून जाधव यांच्या निकटवर्तीयांकडून मोठय़ा प्रमाणात पैशांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जाधव यांनी वांद्रे-कुर्ला संकुल येथील सायबर सेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

अंधेरी पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक जाधव यांच्या ई-मेलवरून अनेकांना एक मेल पाठवण्यात आला होता. या ई-मेलमध्ये 'मी परदेशात आहे. माझ्या चुलत भावाचा भारतात अपघात झाला असून त्याची पत्नी मरण पावली आहे. मला भारतात पोहोचायला ७२ तास लागतील. त्यामुळे माझ्या खात्यात त्वरित ३ हजार डॉलर्स जमा करावेत, अशा आशयाचे ई-मेल अशोक जाधव यांच्या नावाने पाठवण्यात आले होते. हा मेल माजी खासदार गुरुदास कामत यांच्यासहित अनेकांना मिळाल्यानंतर खासदार कामत यांनी अशोक जाधव यांच्याकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. आमदार अशोक जाधव यांनी ताबडतोब वांद्रे संकुल येथील सायबर सेल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. सायबर सेल पोलिसांनी अशोक जाधव यांचा ई-मेल तपासला असता त्यांचा ई-मेल परदेशातून हॅक करण्यात आल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी सायबर सेल पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

Post Bottom Ad