मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई मधील अनधिकृत व बेकायदेशीर कामांवर कारवाई करण्याचे अधिकार असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील मुख्यालयातच बेकायदेशीर पणे रित्या क्यांन्टिंग सुरु आहे. या क्यांन्टिंग वर सोमवारी पालिकेच्या "ए" वार्ड ने धाड टाकली आहे.
महानगर पालिकेच्या मुख्यालयातील तळमजल्यावर मे. व्ही. एन. क्याटरस कडून ही क्यांन्टिंग चालवण्यात येते. क्यांन्टिंग चालवण्यासाठी हवा असलेला आरोग्य विभाग आणि दुकाने व आस्थापना विभागाचा परवाना या क्यांन्टिंग चालकाकडे नाही. तरीही क्यांन्टिंग बेकायदेशीर रित्या चालू आहे. याबाबत " ए " वार्ड च्या आरोग्य विभागाने ३९४ कलमान्वये कारवाई केली आहे.
महानगर पालिकेच्या मुख्यालयातील क्यांन्टिंग पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बेकायदेशीर रित्या सुरु आहे. शरद यादव या आरटीआय कार्यकर्त्याने क्यांन्टिंग बाबतच्या परवान्यांची मागणी माहिती अधिकारातून केली होती. माहिती अधिकारातून आपले पितळ उघडे पडणार असे समजल्यावर आरोग्य आणि दुकाने व आस्थापना विभागाने क्यांन्टिंग चोकशी सुरु केली आहे. आरोग्य विभागाने तशी नोटीससुद्धा दिली आहे. परंतू दुकाने व आस्थापना विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी क्यांन्टिंगमध्ये बसून खाण्याचा आनंद लुटण्यात आपला वेळ घालवला.
या प्रकरणाची गंभीर दखल मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी घेतली आहे. कर्मचारी आणि लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यावर कारवाई केली जाईल. कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जे अधिकारी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. मंगळवारी ए विभागाच्या आरोग्य आणि दुकाने व अस्थापना विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून या बैठकी नंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे आंबेकर यांनी सांगितले आहे.