ई टेंडरिंग घोटाळ्याचे पालिका सभागृहात तीव्र पडसाद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 September 2014

ई टेंडरिंग घोटाळ्याचे पालिका सभागृहात तीव्र पडसाद

आयुक्तांच्या विरोधात सभागृह तहकूब 
मुंबई: मुंबई महानगर पालिकेच्या ई टेंडरिंग मधील १०० कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या घोटाळ्याचे पडसाद आज शुक्रवारी पालिका सभागृहात उमटून सभागृह तहकूब करण्यात आले. 

लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदर यांच्या सगनमताने कामे करताना भ्रष्ट मार्गाचा अवलंब होत असल्याचा संशय प्रशासनातील अधिकार्यांनी व्यक्त करून ई टेंडरिंग पद्धत सुरु करण्यात आली. कामामध्ये पारदर्शकता यावी म्हणून ऑक्टोबर २०१२ पासून या पद्धतीचा अवलंब करण्यात आला . ऑक्टोबर २०१३ पासून ५० टक्के ई टेंडरिंग पद्धतीनुसार कामे करण्यात येत आहेत . 

३ ते ५ लाखा पर्यन्तची कामे या प्रक्रियेद्वारे सर्व नियम धाब्यावर बसवून देण्यात आली.  यामध्ये १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा अहवाल सदर झाला आहे. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी सभागृहात निवेदन करून आयुक्तांनी कठोर निर्णय घ्यावा, संबंधित अभियंत्यांना निलंबित करावे व ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून चौकशी करावी अशी मागणी केली. 
 
पालिकेत एवढा मोठा घोटाळा झाला असताना यावर आयुक्तांनी सभागृहात येउन निवेदन करावे , अशी मागणी करण्यात आली . परंतु आयुक्त सभागृहात येउन निवेदन करावे अशी मागणी करण्यात आली. परंतु आयुक्त सभागृहात आले नसल्याने सभागृह नेत्या तृष्णा विश्वास राव यांनी झटपट सभागृह तहकुबीची मागणी केली असता महापौर स्नेहल आंबेकर यांनी सभा तहकूब केली. सभागृह तहकुबीनंतरही विरोधकांचे समाधान न झाल्याने विरोधकांनी पालिका आयुक्तांच्या कार्यालया समोर जोरदार घोषणाबाजी केली. 

Post Bottom Ad