मुंबई / रशिद इनामदार
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातून गरोदर महिलांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जाते.माता आणि जन्माला येणारे बालक या दोघांच्या ही आरोग्यासाठी ही तपासणी आवश्यक असते.मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात ही सेवा मोफत दिली जाते. त्या सेवेचे असलेल्या लोकसंख्येनुसार आधुनिकीकरण झाले नसल्यामुळे गरोदर महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
राजावाडी रुग्णालय,घाटकोपर आणि पंडित मदन मोहन मालवीय रुग्णालय,गोवंडी या रुग्णालयात गरोदर महिलांना अशाच गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. या दोन्ही रुग्णालयाच्या आजूबाजूचा परिसर पाहता. रुग्णालय सुरु झाले होते तेंव्हा आणि आज ची परिस्थिती खूप वेगळी आहे. लोकसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना या रुग्णालयांमधील सेवांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या. परंतु त्या अपुऱ्या पडत आहेत . गरोदर महिला नियमित तपासणीसाठी डॉक्टरांनी दिलेल्या तारखेला रुग्ण्यालयात जातात.त्यांना बराच काळ रांगेत उभे राहावे लागते.
बऱ्याचदा महिलांची रांग संपेपर्यंत डॉक्टरांनाही थांबावे लागते.४ वाजेपर्यंत वेळ असून देखील ६ वाजेपर्यंत डॉक्टर व कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असतात. परिस्थितीमुळे खाजगी रुग्णालयात जाणे त्या महिलांना शक्य नसते . तेंव्हा सरकारी रुग्णालयामध्ये उपचार घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. तिथेही त्यांना असा त्रास सहन करावा लागतो. त्यांना रुग्णालयात नेता यावे यासाठी घरातील कमावत्या व्यक्तीला कामाची सुट्टीही घ्यावी लागते. आधीच काटकसर करून संसाराचा गाडा हाकताना या सुट्ट्यांमुळे आणखी कमी होणाऱ्या वेतनाने अवघड परिस्थितीतून त्यांना जावे लागते.
गरोदर महिलांना असा त्रास सहन करायला लागू नये यासाठी प्रशासनाने लक्ष घालून आवश्यक त्या उपाय योजना करायला हव्यात अशी स्थानिकांची मागणी आहे. जोवर प्रशासन आवश्यक असलेली साधने आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करीत नाही तोवर गरोदर महिलांना हा त्रास सहन करावा लागणार हे चित्र सध्यातरी दिसत आहे .
या समस्येला वाढलेली लोकसंख्या मुख्यतः कारणीभूत आहे. आमच्याकडे काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांची टंचाई होती.तेंव्हा खूप समस्या होत्या. आम्ही कोणत्याही महिलेला नियमित तपासणी च्या दिवशीच तपासणी झाल्याशिवाय घरी जाऊ देत नाही. आमचे डॉक्टर आणि कर्मचारी ४ वाजेपर्यंत कामाची वेळ असून देखील ६ वाजेपर्यंत काम करतात. कोणालाही माघारी पाठवत नाहीत.
विद्या ठाकूर ,डीन, राजावाडी रुग्णालय
गरोदर महिलांची नाव नोंदणी करताना योग्य खबरदारी घेतली जात नाही. त्यांना वाट पाहायला लावतात . जेंव्हा या रुग्णालयातून त्यांना सेवा देणे अवघड होते तेंव्हा त्या महिलांना शिव येथील लोकमान्य टिळक सांगतात. किंवा इतर कोणत्या रुग्णालयात जायला सांगतात. प्रसूती चा काळ जवळ आल्यावर बहुतेकदा संगीतालं जातं. जेंव्हा इतक्या लांब प्रवास करून जाणं अवघड असतं . मग आधीच का नाही त्यांना इतर रुग्णालयात नाव नोंदणी करण्याचा सल्ला दिला जात.
खान नसीम , समाजसेविका, बुलंद आवाज नारी संघटना