मुंबई - म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने आचारसंहितेचा धसका घेऊन अखेर 323 पात्र रहिवाशांची मास्टर लिस्ट जाहीर केली. पुनर्वसन न झालेल्या रहिवाशांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. ही प्रारूप यादी असून, म्हाडाने हरकती व सूचना मागवल्या आहेत. तरीही विधानसभा निवडणुकीनंतरच घरांच्या चाव्या लाभार्थींना मिळण्याची शक्यता आहे.
मूळ उपकरप्राप्त इमारतीतील ज्या भाडेकरू किंवा रहिवाशांचे पुनर्वसन होत नाही, त्यांना इतरत्र कायमस्वरूपी घरे देण्याचे म्हाडाचे धोरण आहे. त्यानुसार म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने दोन वर्षांपूर्वी मास्टर लिस्टवरील 94 रहिवाशांना घरे दिली होती. त्यानंतर वर्षभरापूर्वी 27 फेब्रुवारी व 22 ऑक्टोबरला जाहिरातीद्वारे रहिवाशांना अर्ज करण्याचे आवाहन केले. म्हाडाने 595 घरांसाठी मास्टर लिस्ट तयार करण्याचे काम सुरू केले होते. त्यासाठी जवळपास एक हजार 497 अर्ज आले होते.

घरांची संख्या कमी असल्याने म्हाडाने यादीत पूर्वीपासूनच्या लाभार्थींना प्राधान्य दिले. अर्जांची पडताळणी केल्यानंतर 323 पात्र रहिवाशांची प्रारूप यादी जाहीर केली. उर्वरित 49 प्रकरणे प्रलंबित आहेत. म्हाडाच्या वेबसाईटवर अपात्र रहिवाशांची यादी जाहीर करण्यात आली असून, त्याचे कारणही देण्यात आले आहे. प्रारूप यादीवर 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. त्यानंतर ही यादी अंतिम करण्यात येईल. आचारसंहितेमुळे घरांचे वाटप रखडण्याची शक्यता आहे. पुरावे असतील तरच हरकती स्वीकारण्यात येतील, असे म्हाडाने स्पष्ट केले.
आचारसंहितेआधी म्हाडाचा उद्घाटनाचा धडाका
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे शीवच्या प्रतीक्षानगरमध्ये करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे उद्घाटन आज पार पडले. गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मलनिःसारण वाहिनी टाकणे, नवीन लिफ्ट बसवणे व इतर कामांचा त्यात समावेश आहे. या वेळी मंडळाचे सभापती प्रसाद लाड व म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते.