मुंबई – दुरुस्ती कामानिमित्त रेल्वेच्या तीनही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण डाउन धीम्या मार्गादरम्यान सकाळी ११.०० ते दुपारी ३.३० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे मुलुंड स्थानकावरून सुटणारी डाउन सेमी जलद मार्गावरील लोकलसेवा मुलुंड व माटुंगा स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावरून चालवण्यात येईल.
यादरम्यान सकाळी १०.०८ ते दुपारी २.४० वाजेपर्यंत सीएसटीहून सुटणा-या लोकलसेवा संबंधित स्टेशनांवर पंधरा मिनिटे उशिराने पोहोचतील. त्याचप्रमाणे सकाळी १०.५० ते दुपारी ०३.३६ वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणा-या अप जलद मार्गावरील सर्व लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर तसेच कुर्ला स्थानकांवर थांबवण्यात येणार आहेत.
हार्बर मार्गावर नेरूळ-मानखुर्द अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी १०.२३ ते दुपारी २.४५ या वेळेत सीएसटीहून पनवेल, बेलापूर, वाशी या मार्गातील अप आणि डाउन मार्ग बंद केला जाणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. पश्चिम मार्गावरील गोरेगाव व बोरिवली या स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत जम्बोब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे गोरेगाव व बोरिवली स्थानकादरम्यान अप व डाउन जलद मार्गावरील धीम्या मार्गावर लोकल वळवण्यात येणार आहेत.