राष्ट्रवादीने पाठिंबा काढल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे राजीनामा देतील, हे जवळपास नक्कीच झाले होते. त्यानुसार काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा राज्यपाल सी. व्ही. राव यांच्याकडे सोपवला आहे. त्यामुळे राज्यपालांच्या निर्णयाची आता महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे.दरम्यान, महाराष्ट्रातील सरकार अल्पमतात आल्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच भाजपने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांचे या परीस्थितीकडे लक्ष वेधले होते.