उद्योगधंदे परराज्यात नेणाऱ्यांचे डाव हाणून पाडणार - जयंत पाटील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 September 2014

उद्योगधंदे परराज्यात नेणाऱ्यांचे डाव हाणून पाडणार - जयंत पाटील

मुंबई (प्रतिनिधी) – मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. ती राहिलीच पाहिजे. येथील उद्योगधंदे जर बाहेर नेणे योग्य नाही. येथील बंदरावर होणारा व्यवहार आणि रिजर्व बँकां गुजरातमध्ये हलवून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न कोणी करत असल्यास त्यांचा डाव हाणून पाडला जाईल, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार भाई जयंत पाटील यांनी शुक्रवारी दिला. 

मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाने आयोजित केलेल्या विधानसभा निवडणूक वार्तालापात ते बोलत होते. मुंबईचे ऐतिहासिक महत्त्व आहे. मुंबईचे आर्थिक महत्त्व प्राचीन काळापासून आहे. शिवाजी महाराजांच्या काळात मुंबईतील बंदरे बांधली गेली. ब्रिटीशांनाही शिवाजी महाराजांकडून परवाना घेतल्याशिवाय मुंबईत येता येत नव्हते. मुंबई ही संयुक्त महाराष्ट्राची आहे. त्यामुळे मुंबईतील उद्योगधंदे आणि व्यवहार बाहेर गेल्यास त्याला तीव्र विरोध केला जाईल, असेही ते म्हणाले. राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांचे साटेलोटे होते, असा आरोपही त्यांनी केला. यावेळच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लोकसभेच्या निकालापेक्षाही फारच वेगळे असतील. परिवर्तन असलेले चित्र तुम्हाला येत्या विधानसभेत पाहायला मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बॅनरखाली विधानसभेच्या सर्व जागा लढवत असून अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या आघाडीसोबत यावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. स्वतंत्र विदर्भावरून आमच्यात व आंबेडकर यांच्यात काही मतभेद आहेत, म्हणून त्यांना आघाडीत यायला उशीर होत आहे, असेही ते म्हणाले. आम्हाला आमची ताकद माहित आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकांनतर कोणाला पाठींबा द्यायचा हे आगामी स्थितीवरून ठरवण्यात येईल, असेही जयंत पाटील म्हणाले

Post Bottom Ad