कॉर्पोरेट कंपन्यांना सार्वजनिक स्वच्छतागृहांचे वावडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 September 2014

कॉर्पोरेट कंपन्यांना सार्वजनिक स्वच्छतागृहांचे वावडे

मुंबई : समाजातील विविध सामाजिक उपक्रमांना भरभक्कम आर्थिक मदत देऊ करणार्‍या बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना सार्वजनिक स्वच्छतागृहांचे वावडे असल्याचे दिसून आले आहे. मध्य रेल्वेवर सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न बिकट होत असताना खाजगी कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) प्रक्रि येंतर्गत साहाय्य करण्यास पूर्णपणे नकार दिला आहे. स्वच्छतागृहांशी आपल्या कंपनीचे नाव जोडले गेले तर त्याचा विपरित परिणाम आपल्या कंपनीच्या इमेजवर होईल, अशी शंका या बड्या कंपन्यांना असल्यामुळे त्यांनी आपला सहभाग टाळला आहे. 

मध्य रेल्वेच्या स्थानकावरील स्वच्छतागृहांच्या देखभालीच्या खर्चासाठी दर आकारणी केली जाते. मध्य रेल्वेच्या २0 रेल्वे स्थानकांवर स्वच्छतागृहांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. या स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी प्रवाशांकडून 'पे अँण्ड युज'नुसार प्रत्येकी १ रुपया आकारण्यात येणार असल्यामुळे मध्य रेल्वेवर टीका केली जात आहे. या स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी मध्य रेल्वेने अनेक बड्या कॉर्पोरेट कंपन्यांशी संपर्क साधला; परंतु या कंपन्यांनी या योजनेत सहभाग घेण्यास नकार दर्शवला आहे.

Post Bottom Ad