दिल्ली मुंबईत सर्वाधिक बलात्कार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 September 2014

दिल्ली मुंबईत सर्वाधिक बलात्कार

मुंबई - महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. देशात दररोज ९२ बलात्काराच्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात होते, अशी माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे. राजधानी दिल्ली महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित असून २०१३ मध्ये येथे बलात्काराच्या १६३६ घटना नोंदविल्या गेल्या. त्याखालोखाल मुंबईत ३९१, जयपूर १९२ आणि पुण्यात १७१ घटनांची नोंद झाली आहे.


२०१२मध्ये देशभरात २४९२३ बलात्कारांची नोंद झाली. २०१३मध्ये ही संख्या ३३७०७ झाली होती. यातील १५५५६ घटनांमध्ये पीडित तरुणींचे वय १८ ते ३० दरम्यान होते. १३३०४ घटनांमध्ये पीडित अल्पवयीन आहेत. शहरनिहाय आकडेवारीवरून राजधानी दिल्ली महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित असून येथे बलात्काराच्या रोज चार घटनांची नोंद होत आहे.

२०१३ मध्ये मध्य प्रदेशात सर्वाधिक ४३३५ बलत्काराच्या घटनांची नोंद झाली. हे प्रमाण दिवसाला ११ आहे. त्याखालोखाल राजस्थान ३२८५, महाराष्ट्र ३०६३ आणि उत्तर प्रदेशात ३०५० घटना नोंदविल्या गेल्या. महाराष्ट्रात दिवसात सरासरी नऊ घटनांची नोंद होते.

Post Bottom Ad