राज्यात राष्ट्रपती राजवट? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 September 2014

राज्यात राष्ट्रपती राजवट?

vidhanbhavan
राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार अल्पमतात आल्यामुळे कोणत्याही क्षणी आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस राज्यपाल करतील, असे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. खरेतर राज्यपाल सध्याच्याच मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून निवडणुकीपर्यंत कारभार सांभळण्यास सांगू शकतात. मात्र, राष्ट्रपती राजवट लावली व होऊ घातलेल्या चौरंगी लढतीमध्ये कुठल्याही पक्षास स्पष्ट बहुमत मिळाले नाही. तर केंद्र शासन ही राजवट पुढील सहा महिने सुरू ठेवू शकते, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Post Bottom Ad